प्रभुराज प्रतिष्ठाण च्या वतीने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण

प्रभुराज प्रतिष्ठाण च्या वतीने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण

लातूर (प्रतिनिधी) : अनाथांची माय म्हणून देशात ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिकसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ माई यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्ती मध्ये सिंधुताई सपकाळ यांच नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या निधनाने सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्मेस शांति मिळावी म्हणून मेणबत्ती पेटवून दोन मिनिटं स्तब्ध राहून प्रभुराज प्रतिष्ठाण च्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी प्रभुराज प्रतिष्ठाण चे अध्यक्ष अँड.अजय कलशेट्टी, अँड.सुरेश सलगरे, अँड.कल्पना भुरे, समाजसेवक पूजा निचळे, जेष्ठ नागरिक काशिनाथ आचवले, ग्यानोबा मोरे, अभिजित सगरे, रोहित पाटील, गोपाळ खंडागळे, महेश पाटील, अभिषेक जाधव, करणकुमार भुतेकर, देवा राठोड, राम दुममे, कृष्णा फावडे, सचिन भोसले, श्रावनकुमार सेवलकर, शिवा शिंदे, सतीश चव्हाण, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author