लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने
लातूर (प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यिक होते त्यांनी त्यांचे साहित्य, पोवाडे, गीत या माध्यमातून समाज प्रभोधनाचे कार्य केले. त्यांचे समाजकार्य उल्लेखनीय होते त्यांची जगभरात ख्याती होती, परंतु नुकतेच केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या फाउडेशनच्या माध्यमातून महापुरुषांची यादी जाहीर करण्यात आली त्या यादी मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव वगळण्यात आले. याची समाजमाध्यमातून विचारणा झाली असता ते प्रसिद्ध नाहीत अशी कारणे देण्यात आली वास्तविक जाणीवपूर्वक जातीयवादी विचाराने प्रेरित होऊन केंद्र सरकारने सदर नाव वगळण्याचे काम केले आहे. याविरोधात दि. 5 जानेवारी रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ,लातूर येथे लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरणजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली व लातूर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाचे अध्यक्ष प्रा.प्रवीण कांबळे यांच्या संयोजनाखाली निषेध, निदर्शने करण्यात आले व यासंदर्भात जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत राष्ट्रपती, भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी लातूर जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड.समदजी पटेल, लातूर शहर महानगरपालिका महापौर विक्रांतजी गोजमगुंडे, गोरोबा लोखंडे, लक्ष्मण कांबळे, मोहन माने, कैलास कांबळे, ॲड.देविदास बोरूळे पाटील, संजय ओहळ, प्रा.एम.पी.देशमुख, रणधीर सुरवसे, ॲड.अंगद गायकवाड, ॲड.सुनीत खंडागळे, अभिजित इगे, जी.ए. गायकवाड, विकास कांबळे, राजू गवळी, राज क्षीरसागर, आनंदभाई वैरागे, गोविंद केंद्रे, प्रमोद जोशी, दयानंद कंधारकर, खाजा शेख, श्रवण मस्के, नितीन सोमवंशी, किरण बनसोडे, सोमेश हजारे, रवी पेटाडे, संजय सुरवसे, अजय अडगळे, बालाजी सगट, सचिन शिंदे, अशोक सूर्यवंशी, सुलेखा कारेपूरकर, हरिदास मगर, भीमराव नवले, नितीन सोमवंशी, दशरथ, भुमे, गोविंद शिंदे, करीम तांबोळी आदी मान्यवर उपस्तिथ होते.