दयानंद वाणिज्य महाविद्यालयात लसीकरणास सुरूवात

दयानंद वाणिज्य महाविद्यालयात लसीकरणास सुरूवात

महाविद्यालयात 517 विद्यार्थ्यांनी घेतली लस

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 5 व 6 जानेवारी रोजी इयत्ता अकरावी व बारावी तील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात आला. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था महाविद्यालयात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दयानंद गर्ल्स होस्टेल चे चेअरमन शशिकांत कोटलवार शालेय समिती सदस्य विशाल अग्रवाल दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पुनम नथांनी, दयानंद फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांती सातपुते, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप जगताप ,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक मिलिंद माने, लातूर मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बनाटे, दयानंद महाविद्यालयातील लसीकरण युनिटच्या समन्वयक व मनपाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. मुडपे, पंचायत समिती चे कुलकर्णी, व्यवस्था सहाय्यक मनपा लातूरचे पवार व त्यांची टीम दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे समन्वयक प्रा. सुभाष मोरे कार्यक्रमाधिकारी प्रा. दिपक वेदे व प्रा. जाधव तसेच क्रीडा प्रमुख प्रा. कल्पना टप्पेकर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम महाविद्यालयातर्फे मान्यवरांचे स्वागत करुन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन डॉ.ईश्वर प्रसाद बिदादा यांनी केले. पहिल्या दिवशी 517 विद्यार्थ्यांचे लसीकरण यशस्वीपणे करण्यात आले. ही लसीकरण मोहीम नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

About The Author