नायलॉन मांजाची साठवणूक व विक्री करणाऱ्या 8 दुकानदारा विरोधात गुन्हे दाखल

लातूर पोलीसांची कारवाई; 7,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने नायलॉन/ चायनीज तसेच प्लास्टिक किंवा अन्य सिंथेटिक पासून बनवलेल्या मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. नायलॉन मांजा विकणे, बाळगणे आणि साठवणे यावर बंदी घातली आहे. तरी काही दुकानदार प्रतिबंधित मांजाची साठवणूक, विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांचे निर्देशान्वये व अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली दि 5 जानेवारी 2022 रोजी मंगळवारी संपूर्ण लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित मांजाची साठवणूक व विक्री करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबवून त्या त्या पोलिस स्टेशनचे कडून संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात आली. एकूण 8 दुकानदारांवर 8 गुन्हे दाखल करण्यात आले असून 7000 रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेली कारवाई खालीलप्रमाणे
1) उदगीर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 06/2022 कलम 188 भादवी, तसेच सह कलम 5, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986.
2) शिवाजीनगर पोलीस ठाणे गुरनं 14/2022 कलम 188 भादवी, तसेच सह कलम 5, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986.
3) एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं 06/2022 कलम 188 भादवी, तसेच सह कलम 5, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986.
4) विवेकानंद चौक पोलीस ठाणे गुरनं 20/2022 कलम 188 भादवी, तसेच सह कलम 5, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986.
5) विवेकानंद चौक पोलीस ठाणे गुरनं 21 /2022 कलम 188 भादवी, तसेच सह कलम 5, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986.
6) पोलीस ठाणे, निलंगा पोलीस ठाणे गुरनं 03/2022 कलम 188 भादवी, तसेच सह कलम 5, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986.
8) अहमदपूर पोलीस ठाणे गुरनं 04/2022 कलम 188 भादवी, तसेच सह कलम 5, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांचे आवाहन : – शासनाने नायलॉन/ चायनीज मांजा आणि प्लास्टिक पतंगांवर बंदी घातली आहे. त्यामुळे मांजा तसेच प्लास्टिक पतंग विकणे, बाळगणे, साठवणे गुन्हा आहे. त्यामुळे दुकानदाराने व प्रतिबंधित मांजा विकू नये किंवा वापरू नये तसेच नागरिकांनी सदरचा प्रतिबंधित मांजा चा वापर करू नये असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.