दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना पोलिसांनी केले अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना पोलिसांनी केले अटक

पिंपरी (प्रकाश इगवे) : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली. इतर दोन आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. कृष्णाई पेट्रोल पंपाजवळ वडमुखवाडी येथे सोमवारी (दि. ३) रात्री पावणेअकराच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.

आकाश अनिल मिसाळ (वय २१, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रूपेश सुरेश पाटील (वय ३०, रा. मु. पो. वडगाव बटुक), ऋतिक दिलीप तापकीर (वय २६, रा. पाषाण, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर करण आणि सनी (पूर्ण नाव, पता माहीत नाही) यांच्यावरही दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

About The Author

error: Content is protected !!