तरुणास मारहाण करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

तरुणास मारहाण करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल

कासार शिरसी (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील भूतमुगळी येथे एका तरुणास मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात कासार शिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, भूतमुगळी येथील गोविंद दत्ता सावंत या तरुणास गावातीलच विजयकुमार गणेश चव्हाण, ओम विजयकुमार चव्हाण, सुर्यकांत माणिक चव्हाण, परमेश्वर माणिक चव्हाण, विशाल प्रेमनाथ चव्हाण, युवराज मारुती चव्हाण, सुधाकर माणिक चव्हाण यांनी मागील कुरापत काढून तु मला कट का मारलास म्हणत दि. ३ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता कांत भालके यांच्या घरासमोर काठीने उजव्या मांडीवर, मानेवर, मनगटावर हातावर मारून जब्बर जखमी केले व शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्यादी गोविंद दत्ता सावंत यांनी कासारशिरसी पोलिसात दिली. यावरुन सर्व आरोपीविरुध्द गुरन ३/२२ कलम १४३, १४७,१४८, १४९,३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे सर्व सात जणांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर करीत आहेत.

About The Author