दारू पिण्यासाढी पैसे न दिल्याने मारहाण

दारू पिण्यासाढी पैसे न दिल्याने मारहाण

पिंपरी (प्रकाश इगवे) : दारूसाठी पैसे न दिल्याने दुकानदारास मारहाण करून दुकानावर दगड मारून तोडफोड केली. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी येथे सोमवारी (दि. ३) रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.

सूरज चुन्नीलाल चौधरी (वय १८ रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. ४) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रोशन, शंकर पूर्ण नाव-पत्ता माहिती नाही आणि त्यांचे दोन अज्ञात साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

अधिक माहितीनुसार, चौधरी हे दुकान बंद करत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपी रोशनने फिर्यादीला चावा घेऊन त्यांना जबर जखमी केले. आरोपींपैकी एकाने कुणीतरी दुकानात दगड मारून काचा फोडून नुकसान केले.

About The Author

error: Content is protected !!