लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी (योगिता कोरे) : तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. भोसरी तसेच डुडुळगाव येथे मार्च २०२१ ते २ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये ही घटना घडली.

कमलेश दत्तात्रय वाळुंज (वय ३०, रोड, भोसरी) स्पाईन रोड, रा. याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित अल्पवयीन मुलीने याप्रकरणी मंगळवारी (दि. ४) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधली. तिच्याशी शारीरिक संबंध करून त्याचे व्हिडिओ काढून अल्पवयीन मुलीला पाठवले. ते व्हिडीओ इतरांना पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर २ जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास आरोपीने किरकोळ कारणावरून वाद घालून फिर्यादीची आई व फिर्यादीचा मामेभाऊ यांना मारहाण करून पाहून घेण्याची धमकी दिली. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तपास करीत आहेत.

About The Author