साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करा
रेणापूर तालुका काँग्रेस चे तहसिल कार्यालयासमोर निर्दशने
रेणापूर (प्रतिनिधी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव केंद्र सरकारने महापुरुषांच्या यादीतून वगळले असुन त्यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी दि. ७ जानेवारी रोजी रेणापुर तहसिल कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली व या मागणीचे निवेदन तहसिलदार रेणापूर यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पाठवण्यात आले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यिक होते त्यांनी त्यांचे साहित्य, पोवाडे, गीत या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले असून त्यांचे साहित्य व समाजकार्य उल्लेखनीय असल्याने त्यांची ख्याती जगभरात आहे. मात्र केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या फौंडेशनच्या माध्यमातून महापुरुषांची यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव वगळण्यात आले आहे. याबाबत समाजमाध्यमातून विचारणा केली असता ते प्रसिद्ध नाहीत अशी कारणे देण्यात आली. वास्तविक जाणीवपूर्वक जातीयवादी विचाराने प्रेरित होऊन केंद्र सरकारने सदर नाव वगळण्याचे काम केले आहे. या घटनेचा रेणापूर शहर व तालुका, अनुसुचित जाती विभाग कॉंग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे. या मागणीचे निवेदन तहसिलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांना देण्यात आले.
यावेळी रेणापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, सेवादल कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी, अनुसुचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष अजय चक्रे, संगायो समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, कॉग्रेसचे शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, सेवादलचे तालुकाध्यक्ष हनमंत पवार, कॉग्रेसचे गटनेते पदम पाटील, एन.एस.यू.आय. चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब करमुडे,
नगरसेवक भुषण पनुरे, अनिल पवार, जनार्धन माने, नागनाथ दळवी, रमेश बोने, सचिन इगे, अशादुल्ला सय्यद, प्रशांत माने, सरपंच महेश खाडप, नागनाथ दळवी, मनोहर व्यवहारे, गणेश कलाल, रहिम पठाण, दादाराव कांबळे, राजभाऊ रवाडप, प्रदिप काळे, शिवाजी रणदिवे, राज मस्के, प्रकाश बुतके, रोहित गिरी, राम शिंदे यांच्यासह तालुका व शहर काँग्रेस व युवक काँग्रेस आणि तसेच विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.