श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोविड 19 लसीकरण संपन्न
उदगीर : येथील श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उदगीर येथे 18 व 18 वर्षावरील विद्यार्थ्यांचे कोविड संरक्षक लसीकरण करण्यात आले. आरोग्य विभाग राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे आज दिनांक 07 जानेवारी 2022 रोजी प्रातः कालापासून आधार कार्ड नोंदणी करून पालकांच्या सहमतीने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट पूर्व दृष्टीस ठेवून संरक्षण कवच म्हणून शासनाने विद्यार्थ्याचे लसीकरण करण्याचे ठरविले. या कार्यास तुरंत प्रतिसाद म्हणून श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात लसीकरण करण्यात आले. इयत्ता नववी ते 12 वी वर्गातील विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला. सदर लसीकरण विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली व्यवस्थित रित्या पार पडले. सदर लसीकरणाच्या कार्यात आरोग्य विभाग उदगीर येथील डॉक्टर इंद्राळे संजय पंढरीनाथ, हनुमंते, कोमल राठोड व डॉक्टर जोशी प्रतीक्षा संजय व डॉक्टर साधू कांचन राधेशाम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याकामी इयत्ता नववी ते बारावी चे वर्गशिक्षक व ज्ञानेश्वर सपाटे, भारत खंदारे ,सतीश बिरादार ,राहुल नादर्गे, गोविंद बारोळे, धनश्री जाधव व विद्यालयाचे सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले .लसीकरण प्रकल्पास संस्थाध्यक्ष ऍड सुपोषपाणिआर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर ,सचिव ऍड विक्रमजी संकाये, सहसचिव श्रीमती अंजुमणिताई आर्य, मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा सह लसीकरणा बद्दल समाधान व्यक्त केले.