पंतप्रधान मोदीजी यांच्या सुरक्षीततेत हालगर्जीपणा करणार्या कॉगे्रस सत्ताधार्याचा भाजयुमोकडून निषेध
लातूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे विकास कामाच्या उदघाटनासाठी फिरोजपूर, पंजाब दौर्यावर गेले असता पराभवाच्या भितीने विरोधकानी त्याचा रास्ताबंद करूण आडचण निर्माण केली त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सुरक्षीततेमध्ये हलगर्जीपणा करणार्या कॉग्रेसचा जाहीर निषेध करून येथील सत्तधार्याच्या विरोधात भाजयुमोच्यावतीने लातूरातील गांधी चौकामध्ये मशाल रॅली काढून पंजाबमधील सत्ताधार्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे विकास कामाचे उदघाटन व देश वाशियांना संबोधित करण्यासाठी फिरोजपूर, पंजाब दौर्यावर गेले असता खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर प्रवास रदद करत रस्त्यावरून प्रवास करण्याचे निश्चीत ठरले दरम्यान आपला पराभव समोर पाहूण घाबरलेल्या विरोधकानी कुटील डाव खेळला आणि काही ठिकाणी त्यांचा रस्ता बंद केला. असी परिस्थीती असतानाही पंजाबचे मुख्यमंत्री यांनी या घटनेला कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे ही राजकीय खेळी असल्याचे समोर आले. पाकिस्तान सिमेपासुन 10 की.मी.अंतरावर मा.पंतप्रधानाच्या जिवीताला धोका पोहचविण्याचा राजकीय प्रयत्न केल्याचे समोर आलेले आहे. परंतू राज्याच्या लोकप्रतिनिधीकडून असी कृति होणे ही देशाच्या दृष्टीने चुकीची आहे. ही बाब लक्षात घेउन भाजयुमोच्यावतीने लातूर शहरातील गांधी चौक ते कॉग्रेस भवन पर्यंत मशाल रॅली काढून या घटनेचा जाहीर करण्यात आला.
या मशाल रॅलीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी उत्फुर्तपणे सहभाग नोंदवत सुलतानी मनोवृत्तीच्या तेथील कॉग्रेस सरकारविरूध्द नारे देत जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यर्त्याची मोठया संख्येनी उपस्थीती होती.