सिंधुताई सपकाळ यांना काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

सिंधुताई सपकाळ यांना काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

रेणापूर (प्रतिनिधी) : अनाथांची माय व थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन झाले. अत्यंत दुःखद प्रसंगी व कठीण काळात संकटांना न घाबरता त्यांनी धीरोदत्तपणे मार्ग काढला व दीनदुबळ्या मुलींची माय होण्याचं कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत रेणापुर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने दि. ७ जानेवारी वार शुक्रवार रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हा. चेअरमन तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, सेवादल कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी, संगायो समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, कॉग्रेसचे शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, सेवादलचे तालुकाध्यक्ष हनमंत पवार, एन.एस. यू. आय तालुका अध्यक्ष बाळासाहेब करमुडे, कॉग्रेसचे गटनेते पद्म पाटील, नगरसेवक भुषण पनुरे, अनिल पवार, लातूर जि. म. बँकेच्या माजी संचालिका सौ.इंदुताई इगे, रेणापूर तालुका महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पूजा इगे, रुक्मीन इंगळे, सौ.निर्मला गायकवाड, जनार्धन माने, नागनाथ दळवी, रमेश बोने, सचिन इगे, अशादुल्ला सय्यद, प्रशांत माने, सरपंच महेश खाडप, नागनाथ दळवी, मनोहर व्यवहारे, गणेश कलाल, रहिम पठाण, दादाराव कांबळे, राजभाऊ रवाडप, शिवाजी रणदिवे, प्रकाश बुतके, राज मस्के, रोहित गिरी, राम शिंदे, यांच्यासह तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस तसेच विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!