राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत मेघराज शेवाळे यास तृतीय पारितोषिक

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत मेघराज शेवाळे यास तृतीय पारितोषिक

लातूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरच्या वतीने आयोजित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होते. या स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयातील इयत्ता बारावी शिकणारा मेघराज दत्तात्रय शेवाळे याने या स्पर्धेत सर्व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.या स्पर्धेत त्याने मानवी जीवन मूल्यांचा सन्मान भारतीय संविधान या विषयावर विचार व्यक्त केले. त्याने शालेय जीवनापासूनच वाद-विवाद वकृत्व स्पर्धा व तसेच युवा संसद स्पर्धेत मोलाची कामगिरी केली आहे. त्याच्या वकृत्व शैलीच्या जोरावर त्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

मेघराज शेवाळे यशाबद्दल दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, वादविवाद व वकृत्व मंडळ प्रमुख डॉ बालाजी घुटे, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, प्रा. महेश जंगापल्ले, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव, दत्ता चौंडे, लखन सुरवसे आदी उपस्थित होते.

About The Author