धक्कादायक : रिक्षा चालकाचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक : रिक्षा चालकाचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे (प्रकाश इगवे) : रिक्षाच्या भाड्याचे पैसे नसल्यामुळे चालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या प्रकरणी तिघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली.

सागर विभीषण बचुटे (वय २४, रा.अप्पर इंदिरानगर), विकीकुमार फुलो पासवान (वय २३) आणि अशोक वीरबहादुर थापा (वय २२, दोघेही रा. फुरसुंगी) यांना अटक केली आहे. सागर हा रिक्षा चालक आहे, तर इतर दोघे किरकोळ कामे करतात. याबाबत १६ वर्षाच्या मुलीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व तिची मैत्रीण या दि. ५ जानेवारी रोजी रिक्षाने प्रवास करीत होत्या, पण त्यांच्याकडे रिक्षा भाड्याचे पैसे नव्हते. त्यामुळे आरोपी सांगर याने रिक्षा भाडे देण्यासाठी पैसे नसल्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन पीडित मुलीवर रेसकोर्स परिसरातील झाडीमध्ये बलात्कार केला, तसेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी आरोपी पासवान व थापा गेले. त्यांनी मुलगी व तिच्या मैत्रिणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

About The Author