दीड लाखचा गांजा जप्त; एका महिलेस अटक

दीड लाखचा गांजा जप्त; एका महिलेस अटक

पिंपरी (योगिता कोरे) : गांजा विक्री प्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने ओटास्कीम, निगडी येथे कारवाई केली आहे. या कारवाईत एका महिलेला (वय २६) अटक करण्यात आली आहे. कारवाईत महिलेकडून दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी दोन वाजता ओटास्कीम, निगडी येथे करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रीसाठी गांजा पुरवणारा आबा पवार (वय ४०, रा. ओटास्कीम, निगडी. मूळ रा. जामखेड, अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author

error: Content is protected !!