महिलेसोबत बोलणे तरुणाला पडले महाग; चौघांनी मिळून केली मारहाण

महिलेसोबत बोलणे तरुणाला पडले महाग; चौघांनी मिळून केली मारहाण

पिंपरी (योगिता कोरे) : नेपाळी महिलेसोबत का बोलतो, असे म्हणून चौघांनी मिळून तरुणाला मारहाण केली. एमआयडीसी भोसरी येथे मंगळवारी (दि. ४) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. अमर गौतम कसबे (वय २२, रा.पांडवनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. ५) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, राजू थापा (वय ३०, रा. नेहरूनगर, पिंपरी) आणि त्याच्या तीन नेपाळी मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे यशवंत चौकातील टपरीजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘हमारे नेपाली औरत के साथ क्यू बात करता है,’ असे म्हणून आरोपींनी मारहाण केली.

About The Author

error: Content is protected !!