विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; सासऱ्यावर गुन्हा दाखल

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; सासऱ्यावर गुन्हा दाखल

पिंपरी (प्रकाश इगवे) : शिवीगाळ व मारहाण करून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोडी येथे ऑक्टोबर २०२१ ते ४ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. पती तेजस प्रताप सूर्यवंशी (वय ३५), सासू (वय ५५), मोठा दीर विजय प्रताप सूर्यवंशी (वय ३६), जाऊ (वय २८, सर्व रा. दापोडी) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपींनी पैशाच्या कारणावरून तसेच वेळोवेळी घरातील कामकाज करण्यावरून टोमणे मारले. त्याचबरोबर शिवीगाळ व मारहाण करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला.

About The Author

error: Content is protected !!