क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त हिरकणी नारीरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त हिरकणी नारीरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अहमदपूर येथे 64 महिला शिक्षिका यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अहमदपूर तालुक्यातील 64 महिला शिक्षिका यांना हिरकणी नारीरत्न पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिला या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आल्या व ग्रामपंचायत सदस्य ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोहोचू शकल्या याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत. भविष्यामध्ये आपण खूप चांगले शैक्षणिक काम करावे, आपल्याला लातूर पॅटर्न चा शैक्षणिक वारसा आहे त्याला साजेसे काम आपण कराल व विद्यार्थी देशसेवेमध्ये व प्रशासकीय सेवेमध्ये पाठवाल अशी अपेक्षाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री बालाजी तुरेवाले, गोपाळ गुट्टे यांनी केले तर प्रास्ताविक रणजित चौधरी यांनी तर मनोगत नंदकुमार कोनाले, बंकट जाधव, फुलाबाई साके, बबन ढोकाडे, रोहिदास वाघमारे, भारतबाई सोळूंके यांनी मांडले तर अध्यक्षिय समारोप अश्विनीताई कासनाळे यांनी केले व आभार सुशेन पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहमदपूर च्या नगराध्यक्षा सौ.अश्विनीताई कासनाळे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. भारतबाई सोळंके, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, अहमदपूर पंचायत समितीच्या सभापती सौ. गंगासागर जाभाडे, उपसभापती बालाजी गुट्टे, जिल्हा शिक्षण समिती स्वीकृत सदस्य नंदकुमार कोणाळे, अरुण साळुंके, अहमदपूर गटशिक्षणाधिकारी ढोकाडे सर, बी.ओ.आय. बँक मॅनेजर दीपक वाडीवाले,नाना बिडवे हे प्रमुख अतिथी होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रणजित चौधरी आदींसह बंकट जाधव सर,गोपाळ गुट्टे, सुशेन पाटील, बालाजी शांदे, तुकाराम चव्हाण, सतिश हलगरे, राजकुमार गोन्टे, एकनाथ कौसे, सोहम गिरी, संकेत गिरी, राम मुंढे, संजय पालकुर्तावार, रजनिकांत जाधव, काशिनाथ लांडगे, अभंग जाधव, गणपत सुर्यवंशी, शेषराव गादगे, दिपक फुलारी, बालाजी मुंढे, विलास तरडे, बालाजी नायणे, मोहन पाटील, कविता राठोड, कमलताई लहाने, माधव लोंड, नायणवाड, ज्योती पाटील, राजू बिरादार, बब्रुवान दुधेवाड, भानुदास शिंदे, नामदेव केंद्रे, अविनाश यलवंदगे, कविता वाघमारे, वैजनाथ सुर्यवंशी, प्रशांत पांचाळ, रमेश मुंढे, रमेश बिरादर, सिद्धेश्वर रोकडे, रामकिशन कोटलवार, गणेश डाके, अरविंद डाके, रमेश गादगे, अश्विन केंद्रे, आदींसह शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author