सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास

सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास

विशेष सत्र न्यायालयाचा निकाल

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शेनकुड येथील एक सहा वर्षाच्या चिमुकलीवर साधारणतःहा एक वर्षापुर्वा चिप्स, कुरकुरे, चॉकलेट खायला देऊन मोबाईलवर गेम खेळू असे म्हणुन घरात नेऊन बलात्कार केल्या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात अहमदपूर येथील विशेष सत्र न्यायालयाने आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास व 25000 रू दंडाची शिक्षा सुनावली आहे

याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील शेनकुड येथे साधारणतःहा एक वर्षापुर्वी दि. 13 जानेवारी 2020 रोजी फिर्यादीने अशी फिर्याद दिली होती की पिडत चिमुकली तिच्या आजोबाला बघण्यासाठी सेनकुड ता. अहमदपूर येथे आली असता फिर्यादीचा चुलत भाऊ यातील आरोपी नामे सचिन संजय गिरी वय 27 वर्ष याने फिर्यादीची सहा वर्षाच्या मुलीस चिप्स, कुरकुरे चॉकलेट खायला देऊन त्यानंतर मोबाईलवर गेम खेळू असे म्हणून घरात घेऊन जाऊन तोंड दाबून जबरदस्तीने बलात्कार केला व अनैसर्गिक संभोग केला तेव्हा पिडीत मुलगी रडू लागली असता तीला सदर झालेला प्रकार कोणासही सांगू नको नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली वैगरे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अहमदपूर येथे आरोपी विरूध्द गुरन 27/2020 कलम 376,. (3)377,506ipc सह 4,6, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक नागोराव जाधव यांच्यासह काही कर्मचारी यांना सोबत देऊन पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन अहमदपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथक रवाना करून फरार झालेल्या आरोपीस पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन त्यास अटक करून पी सी आर घेऊन तपास केला असता आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव यांनी उत्कृष्ट रित्या केला व सर्व साक्षीपुरावे गोळा करून आरोपीं विरुद्ध दोषारोपपत्र अहमदपूर विशेष सत्र न्यायालयात पाठवले. फिर्यादी, पीडित मुलगी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी केलेली तपासणी व तपासी अधिकारी यांची साक्ष यावरून सदर आरोपीस पोस्को विशेष खटला सत्र न्यायालयाचे मानणीय जिल्हा न्यायाधिश संभाजी ठाकरे यांनी आरोपीस दोषी ठरवून गुरन 27/2020 कलम 376,. (3)377,506ipc सह 4,6, पोस्को विशेषखटला क्र.4/2020 मध्ये आरोपी सचिन संजय गिरी रा. शेनकुड ता. अहमदपूर यास 20 वर्ष सश्रम कारावास व 25000/- दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर कोर्ट केस मध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून महेश पाटील यांनी काम पाहिले. कोर्ट कामात कॉन्स्टेबल साबळे यांनी सहकार्य केले. तपासात पोलीस कॉन्स्टेबल पद्माकर पांचाळ यांनी सहकार्य केले. आरोपी अटकेसाठी एपीआय केदार, हनुमंत माने ,नारायण बेंबडे यांनी प्रयत्न करून आरोपीस अटक केली

About The Author