भंगाराच्या गोदामाला आग

पिंपरी (प्रकाश इगवे) : भंगाराच्या गोदामाला आग लागली. यात भंगारातील काही साहित्य तसेच कचरा जळून खाक झाला. बोराडे वस्ती, मोशी येथे रविवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली. तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आली. आगीचे कारण समजू शकले नाही. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास बोराडे वस्ती, मोशी येथील भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार चिखली, तळवडे या उपकेंद्राचे प्रत्येकी एक आणि पिंपरी मुख्य अग्निशामक केंद्राचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

About The Author

error: Content is protected !!