शिकवणीसाठी जात असलेल्या मुलाला मारहाण

शिकवणीसाठी जात असलेल्या मुलाला मारहाण

पिंपरी (योगिता कोरे) : शिकवणीसाठी जात असलेल्या मुलाला पूर्ववैमनस्यातून सिमेंटच्या विटांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सूसगाव येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. सौम्यजित लक्ष्मण साहू, असे जखमी मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई पार्वती लक्ष्मण साहू (वय ३८, रा. सूसगाव, ता. मुळशी) यांनी शनिवारी (दि. ८) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्वराज योगेश मुरकुटे (वय १९), आदित्य खणसे (वय २०, दोघेही रा. सूसगाव) आणि त्यांचे दोन साथीदारांच्य विरोधात गुन्हा दाखल झाला.

About The Author

error: Content is protected !!