टेम्पोची तोडफोड करत तरुणास दगडाने मारहाण

टेम्पोची तोडफोड करत तरुणास दगडाने मारहाण

पिंपरी (रफिक शेख) : तरुणास दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच टेम्पोची काच फोडून साहित्य चोरून नेले. कुदळवाडी, चिखली येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. उमेश देवीदास शिंदे (वय ३०, रा. पवारनगर, थेरगाव) यांनी शनिवारी (दि. ८) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुरेश जाधव आणि त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

About The Author

error: Content is protected !!