चोरट्यांनी तीन पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावले

चोरट्यांनी तीन पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावले

पिंपरी (रफिक शेख) : दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी तीन पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावले. एमआयडीसी भोसरी येथे शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी ही घटना घडली. ऋषिकेश प्रकाश फडतारे (वय २५, रा. भगतवस्ती, भोसरी) यांनी शनिवारी (दि. ८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे स्वामी समर्थ शाळा, एमआयडीसी भोसरी येथून रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातील सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला. त्यानंतर चोरट्यांनी मेहफूज सतार शेख यांचा १० हजार रुपये किमतीचा तसेच वर्षा बाळासाहेब थोरात यांचा तीन हजार रुपये किमतीचा, असे एकूण १९ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटांमध्ये चोरून नेले.

About The Author

error: Content is protected !!