आजारपणा कंटाळून तरुणीची आत्महत्या

आजारपणा कंटाळून तरुणीची आत्महत्या

देहुगाव (प्रकाश इगवे) : विठ्ठलनगर येथील एका तरुणीने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्पना निरंजन सरदार (वय २६) हिने राहत्या घरातील पंख्याला दोर बांधून गळफास घेतला. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नेण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. यासंदर्भात देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!