चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ

पिंपरी (प्रकाश इगवे) : माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने, तसेच चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ केला. बदलापूर येथे एप्रिल, २०१९ ते ८ जानेवारी, २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन महिलांसह चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पती नितीन माधवराव देशमुख (वय ४२, रा.कात्रप, बदलापूर), सासरे माधवराव अण्णासाहेब देशमुख (वय ६६), सासू (वय ६२) आणि नणंद (वय ४२, तिघेही रा.डोंबिवली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत विवाहितेने शनिवारी (दि. ८) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी सासरी नांदत असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला, तसेच माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली.

About The Author

error: Content is protected !!