कलाशिक्षक दीपक बिडकर यांना राज्यस्तरीय पुरस्कारराने सन्मानित
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्हा कला शिक्षक महासंघाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा, बोथी येथील कलाशिक्षक दीपक रामचंद्र बिडकर यांना मुंबई येथे दि.२९ डिसेंबर रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने शिक्षण, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, बासरी वादन यांसारख्या विविध कलाक्षेत्रातील अष्टपैलू कामगिरी बद्दल ‘गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याबद्दल लातूर कला शिक्षक महांघाचे जिल्हाअध्यक्ष महादेव खळुरे सह जिल्हातील सर्व कलाध्यापकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पुरस्कार याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ.रमेश आव्हाड प्रमुख उपस्थिती कांचन शर्मा, डॉ.कृष्णाजी जगदाळे, प्रकाश सावंत यांची प्रमुख उपस्थितीत दीपक बिडकर व पत्नी सौ.राधिका समवेत त्यांना हा पुरस्कार मिळाला. दीपक बिडकर हे संस्कार भारती नांदेड शाखेचे चित्रकला विभाग प्रमुख आहेत.याप्रसंगी संस्कार भारती नांदेड चे अध्यक्ष दि.मा.देशमुख, सचिव डॉ. प्रमोद राव देशपांडे, सहसचिव राजीव देशपांडे, कोषाध्यक्ष अनिलजी पांपटवार, जयंतराव वाकोडकर, अभयजी श्रंगारपुरे, डॉ.जगदीश देशमुख लातूर कला शिक्षक महासंघाचे जिल्हाअध्यक्ष महादेव खळुरे,जयप्रकाश हाराळे,तुकाराम देवकत्ते,पुरुषोत्तम काळे,शिवकुमार गुळवे आदीने बिडकर यांचे अभिनंदन केले आहे.