पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9.15 वाजता क्रिडा संकुलच्या मैदानावर होणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी सकाळी 7.30 वाजता व जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत बार्शी रोड, येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता होणार आहे. व जुने जिल्हाधिकारी कार्यालय शिवाजी चौक येथील ध्वजारोहन अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते सकाळी 8.20 वाजता होणार आहे.

या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही अशासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये असेही यावेळी नमूद करण्यात आले. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह होणार असून आमच्या अधिकृत Dio latur (https://www.facebook.com/dio.latur ) या फेसबुक पेजवरुन सदर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षेपण होणार आहे. या कार्यक्रमाची लिंक आमच्या या पेजवर शेअर केली जाईल. त्या लिंक वर जाऊन सदर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षेपण पाहता येईल.

About The Author