लोकवस्तीमधील अवैध दारुविक्री थांबविण्यासाठी ग्रामस्थांचा अमरण उपोषणाचा इशारा

लोकवस्तीमधील अवैध दारुविक्री थांबविण्यासाठी ग्रामस्थांचा अमरण उपोषणाचा इशारा

औराद शहाजानी (भगवान जाधव) येथील लोकवस्तीमधील अवैध दारुविक्री थांबविण्यासाठी गावातील लोकांनी प्रशासनाकडे तक्रार करुन बंद करण्यासाठी मागणी करुन उपोषणाचा इशारा देण्यात आला. याची सविस्तर माहिती अशी की, शासनाची कसलीही परवानगी नसताना काही लोक हे आपल्या घरामध्ये दुकाने थाटून तसेच काही लोक पाणटपरी लावून त्यामध्ये खुलेआमपणे दारू विक्री करीत असल्यामुळे येथील राहणाऱ्या लोकांना दारू सहजपणे मिळत असल्यामुळे काही दारू पिणारे लोक अश्लील भाषेत शिवीगाळ करून घेत भांडण करत असल्यामुळे व अश्लील भाषेत थट्टामस्करी करीत असल्यामुळे येथील महिलांना घराबाहेर पडणे सुद्धा अवघड झालेले आहे.
येथील लोकवस्तीत दारू सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे दारू पिणारे लोक हे साहाजिकच रोजगार करुन करुन खाणारे असल्यामुळे त्या त्या घरातील महिलांना दररोज त्या दारू पिवून घरी गेल्यामुळे पती-पत्नीचे व मुलाबाळाचे दररोज वाद निर्माण होत आहेत तसेच या भागातील तरुण सुद्धा दारु विक्रीच्या व दारू पिण्याच्या आहारी जात आहेत त्यामुळे त्यांचे संसार उघडयावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आम्ही काही महिला लोकांनी संबंधित दारू विक्री करणाऱ्या लोकांना लोकवस्तीतील दारु विक्री बंद करण्यासाठी विनंती केली, पण ते ऐकण्यास तयार नाहीत त्यामुळे आम्ही काही स्थानिक लोक प्रतिनिधीना संबंधित घटना सांगितली व ती लोकवस्तीत होणारी दारु विक्री सुरुच आहे त्यामुळे तात्काळ दारुविक्री बंद करण्यात यावे अन्यथा गावातील लोक आपल्या मुलाबाळांसह पोलीस ठाणे व ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

About The Author