मौ.मादलापूर येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 11 कोटी 43 लक्ष निधी मंजूर

मौ.मादलापूर येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 11 कोटी 43 लक्ष निधी मंजूर

योजना त्वरित कार्यान्वित करण्यात येणार पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे

मुंबई (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे मादलापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनाने मंजूरी दिली असुन उदगीर येथील मौ.मादलापुर येथील योजनेसाठी 11 कोटी 43 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासुन या गावातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातुन हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना शुध्द 55 लिटर पाणी नळाद्वारे देण्यात येत आहे. सदर योजनेतून प्रत्येक घरात नळ जोडणी देणे आवश्यक असते यासाठी शासनाने हा निधी मंजूर केला आहे. मौ.मादलापूर येथील पाणीपुरवठा योजने साठी 11 कोटी 43 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मौ.मादलापुर या गावासाठी देवर्जन मध्यम प्रकल्प ता.उदगीर येथुन पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमधुन जलशुध्दीकरण केंद्र, जलकुंभ वितरण व्यवस्था, शुध्द पंपीग मशिनरी उभारण्यात येणार आहे. मादलापूर येथील या पाणी पुरवठा योजनेची त्वरीत अंमलबजावणी करून ही योजना लवकर कार्यान्वीत करण्यात येईल आहे जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!