सहारा दूध डेअरीमधील बॉयलरची सफाई करताना एक कामगार ठार; तीन गंभीर
चाकण (प्रकाश इगवे) : चिंबळी फाटा (ता. खेड) येथील सहारा दूध डेअरीमधील बॉयलरची सफाई करताना बॉयलरमधील उकळते पाणी कामगारांच्या अंगावर पडले. त्यात चार कामगार गंभीर भाजले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाळुंगे चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली. मुकेश रामलाई कश्यप (वय ३०) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. सोनू श्रीप्रभूदयाल कश्यप (वय २६), राहुल संतोष कुमार माथूर (वय १८ वर्षे), इसाक अकबर कोतवाल (वय ४५ वर्षे, सर्व रा.चिंबळी फाटा) अशी या घटनेत भाजून गंभीर जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी सहारा दूध डेअरी येथील ऑपरेटर अब्दुल गफार अब्दुल रशीद मुल्ला (वय ४४ वर्षे, रा. कलागोडवस्ती, धानोरी, पुणे) आणि व्यवस्थापक मोहितकुमार राजबहादूर सिंग (वय ५५ वर्षे, रा. कुरुळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
