महिलेचा लालचीपणा तिच्याच अंगलट

महिलेचा लालचीपणा तिच्याच अंगलट

पिंपरी (रफिक शेख) : तीन अनोळखी व्यक्तींनी सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून महिलेचे मंगळसूत्र फसवणूक करून नेले. ही घटना ७ डिसेंबरला दुपारी राजमाता उड्डाण पुलाच्या खाली, भोसरी गावात घडली. कमल जयसिंग आदक (वय ६०, रा. गवळीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवले. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढण्यास फिर्यादीला भाग पाडले.

About The Author

error: Content is protected !!