शारीरिक संबंधाला नकार; बळजबरीने रुणीचा केला विनयभंग
पिंपरी (योगिता कोरे) : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना तरुणीने शारीरिक संबंधाला नकार दिला. त्याकारणावरून तरुणाने तिला मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. हिंजवडी परिसरात ६ जानेवारीला ही घटना घडली. योगेश्वर शशिकांत पगारे (वय २५, रा. मारुंजी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी २५ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी आणि आरोपी मित्र आहेत. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आरोपीने फिर्यादी तरुणीकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. तरुणीने नकार दिला. त्यावरून आरोपीने तरुणीला मारहाण करून जखमी केले.
