भरधाव पिकअपच्या धडकेत दोघे ठार

भरधाव पिकअपच्या धडकेत दोघे ठार

चाकण (प्रकाश इगवे) : भरधाव पिकअप गाडीने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन युवक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.८) कोरेगाव फाटा येथे घडली. अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या चालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. केतन माणिकराव धोंडगे (वय १९) आणि विलास आनंदराव घुले (वय २२, दोघेही चाकण) यांचा मृत्यू झाला आहे. तर गोरख जकाते हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी राहुल पोपट वाळूजकर (रा.बहुरगाव, मावळ) या चालकावर महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आंबेठाण- वराळे रस्त्याने गोरख जकाते याच्या दुचाकीवरून वरील तिघे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामावर जात होते. आंबेठाण गावाच्या हद्दीत ही घटना घडली.

About The Author

error: Content is protected !!