पिंपरी-चिंचवड मध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; रिक्षासह पळविल्या पाच दुचाकी
पिंपरी (रफिक शेख) : शहरातून चोरट्यांनी एक रिक्षा आणि पाच दुचाकी चोरून नेल्या, याप्रकरणी शनिवारी (दि. ८) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. रिक्षाचोरीप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. विपुल सतीश बनसोडे (वय २९, रा. संत तुकाराम नगर, पिपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची १५ हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घरापासून चोरून नेली. ही घटना २४ डिसेंबरला उघडकीस आली. तुषार सुभाष खताळ (वय २४, रा. सावरदरी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी मुटकेवाडी, चाकण येथून चोरून नेली. ही घटना ७ जानेवारीला उघडकीस आली. नितीन बापूराव शिंदे (वय ३६, रा. मांजरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी नाणेकरवाडी येथून चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. ७) उघडकीस आली. आनंद श्रीपती भोसले (वय ४५, रा. बोपोडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी ओम चेंबर्स टी ब्लॉक, बालाजीनगर येथील कंपनीच्या पार्किंगमधून चोरून नेली. ही घटना २१ डिसेंबरला घडली. शिवहरी गुरुनाथ राऊत (वय ३२, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची ५० हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी अंकुश चौक, ओटास्कीम येथील भाजी मंडईमधून चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. ८) घडली.
