घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी (प्रकाश इगवे) : घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. चिंचवड येथे शनिवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. किरण अरुण जानराव (रा. औंध, पुणे), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २२ वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. १०) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची अल्पवयीन बहीण व घरातील इतर सदस्य एकत्र जेवण करीत होते. त्यावेळी अल्पवयीन मुलीचा मित्र घरी आला. तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही, असे म्हणून आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मला तुझ्याशी लग्न करायचे नाही तसेच तुझ्याशी कोणतेही नातेसंबंध ठेवायचे नाही, असे म्हणून अल्पवयीनने धक्का देऊन त्याला दूर केले.

About The Author

error: Content is protected !!