कोरोना नियमाचे उल्लंघन; साईदरबार हॉटेलवर कारवाई
पिंपरी (रफिक शेख) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच हॉटेल आणि इतर आस्थापना सुरू ठेवण्यासाठी वेळ निर्धारित केली आहे. त्यापेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्या दोन हॉटेलवर कारवाई करण्यात आली. वाकड पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या बाजूला मंगळवारी (दि. ११) रात्री एकच्या सुमारास ही कारवाई केली. हॉटेल नीलकमल आणि हॉटेल साईदरबार या दोन हॉटेलवर कारवाई झाली. नीलकमल या हॉटेलवरील कारवाईत मोहम्मद मोईदुट्टी कल्लानाडी (वय ३९, रा. ताथवडे, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक सुनील काटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. आरोपीने त्याचे हॉटेल निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवले. हॉटेल साईदरबार या हॉटेलवरील कारवाईप्रकरणी सफीर मोईदुट्टी कल्लानाडी (वय ४२, रा. ताथवडे, पुणे) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी नाईक रजनीकांत कोळी यांनी फिर्याद दिली. आरोपीने त्याचे हॉटेल निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवले. तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले.