पिंपरी-चिंचवड मध्ये चोरट्यांचा हैदोस; सात दुचाकी चोरीला

पिंपरी-चिंचवड मध्ये चोरट्यांचा हैदोस; सात दुचाकी चोरीला

पिंपरी (प्रकाश इगवे) : वाहन चोरट्यांनी शहर व परिसरातून सात दुचाकी चोरून नेल्या. वाकड, चिखली, चाकण, पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी सोमवारी (दि. १०) गुन्हे दाखल करण्यात आले. वाहनचोरीच्या घटना वाढल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. राहुल सिंग (वय २५, रा. भूमकर चौक, वाकड) यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी, अतुल गोविंदसव मानें (वय ३७, रा. थेरंगाव) यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी, विनीत उदय पाटील (रा. काळेवाडी) यांची २५ हजारांची दुचाकी, दिनेश ज्ञानदेव जासूद (वय ३१, रा. थेरगाव) यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली. दुचाकी चोरीच्या या चारही गुन्ह्यांची वाकड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अब्दुल रज्जाक खान (३८, रा. कुदळवाडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली. अनिल प्रभाकर लहाने (वय २४, रा. आळंदी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दुचाकी चोरीला गेली. अपर्णा रुकीराम गौतम (वय २४, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली.

About The Author

error: Content is protected !!