१० लाख २५ हजार रुपयांची फसवणूक; दोन जणांवर गुन्हा दाखल

१० लाख २५ हजार रुपयांची फसवणूक; दोन जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी (रफिक शेख) : आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देतो, असे सांगून एका व्यावसायिकाची १० लाख २५ हजार ८५१ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे १० फेब्रुवारी २०२० ते १० जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये ही घटना घडली. श्याम साधू गायकवाड (वय ५०, रा. बी. यू. भंडारी स्कायलाइन, दिघी) यांनी सोमवारी (दि. १०) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मार्स लाइफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक दर्शन वर्मा आणि अमित कांतीलाल जैन याच्यावर गुन्हा दाखल झाला. आरोपी दर्शन वर्मा याने त्याच्या मार्स लाइफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केलेल्या पैशावर चांगला परतावा देतो, असे सांगितले.

About The Author

error: Content is protected !!