एकतर्फी प्रेमातून वर्गमित्राने केला तरुणीचा विनयभंग

एकतर्फी प्रेमातून वर्गमित्राने केला तरुणीचा विनयभंग

पिंपरी (रफिक शेख) : एकतर्फी प्रेम करत असलेल्या वर्गमित्राने तरुणीचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. तसेच पाठलाग करूंन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा विनयभंग केला. चिखली येथे रविवारी (दि. ९) सायंकाळी ही घटना घडली. दत्ता कुंभार (रा. पांडवनगर, भोसरी), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३३ वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. १०) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता आणि पीडित तरुणी हे वर्गमित्र आहेत. तो फिर्यादी तरुणीच्या घरी नेहमी येत जात असे. एक महिन्यापूर्वी फिर्यादी तरुणीचे लग्न ठरले. याबाबत तिने वर्गमित्र असलेल्या आरोपीला सांगितले. तुम्ही पाहिलेले स्थळ चांगले नाही. लग्नाला नकार द्या, असा दबाव आरोपी हा पीडित तरुणीच्या कुटुंबीयांवर टाकू लागला. तसेच फिर्यादीच्या होणाऱ्या पतीस व नातेवाइकांना संपर्क साधून पीडित तरुणीचे आणि माझे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यामुळे तुम्ही लग्नाला नकार द्या, असे खोटे सांगून. तरुणीची बदनामी केली.

About The Author

error: Content is protected !!