दोन मुली झाल्याने विवाहितेचा छळ

दोन मुली झाल्याने विवाहितेचा छळ

पिंपरी (रफिक शेख) : विवाहितेला दोन्ही मुली झाल्या. या कारणावरून तिचा छळ केला. अजमेरा, पिंपरी येथे २५ एप्रिल २०१२ ते डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अजय पुरुषोत्तम पिल्ले (वय ३९), शुभलक्ष्मी पुरुषोत्तम पिल्ले (वय ६५) आणि प्रिति रवी स्वाती (वय ३२, सर्व रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत ३० वर्षीय विवाहित महिलेने सोमवारी (दि. १०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी नांदत असताना आरोपी पती, सासू आणि नणंद यांनी विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी सांगितले. मात्र पैसे न आणल्यामुळे छळ केला.

About The Author

error: Content is protected !!