सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकास अटक

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकास अटक

राजगुरुनगर (प्रकाश इगवे) : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या | केबिनला लाथ मारून दालनात येऊन | अरेरावीची भाषा वापरून सरकारी | कामात अडथळा आणल्या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अमितकुमार भरतराव टाकळकर (वय ४२, रा. शिक्षक सोसायटी वाडा रोड राजगुरुनगर ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निवेदिता भानुदास धागे (रा. आशानंद सोसायटी राक्षेवाडी ता. खेड) यांनी पोलीस खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवेदिता घार्गे या राजगुरुनगर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आहेत. आरोपी अमित टाकळकर यांना त्यांचे विविध प्रलंबित मागण्यांचे अनुषंगाने योग्य ती माहिती मुख्याधिकारी घार्गे यांनी दिली होती. दरम्यान टाकळकर याने हातात असलेले कागदपत्रे जोरात घार्गे अंगावर भिरकावली व अरेरावीची भाषा वापरून कर्तव्यास प्रतिबंध केला. टाकळकर याने दालनाचे बाहेर जाऊन थोड्या वेळाने पुन्हा दालनाचे दरवाजास जोराने लाथ मारली व परिषदेच्या दालनात येऊन आक्रमक होऊन अरेरावी केली. उद्घटपणे बोलून सरकारी कामात अडथळा निर्माण करून कोणतेही सरकारी काम होऊ दिले नाही. खेड पोलिसांनी टाकळकर याला अटक असून दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे करत आहे.

About The Author