भर दिवसा विद्यार्थिनीचा विनयभंग

भर दिवसा विद्यार्थिनीचा विनयभंग

पुणे (प्रकाश इगवे) : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीचा शास्त्री रस्त्याजवळील सॅफरॉन हॉटेलजवळ विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नवी पेठेतील २५ वर्षीच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. सोमवारी सकाळी त्या शास्त्री रस्त्यावरून टिळक रस्त्याकडे निघाल्या होत्या. त्यावेळी चिंतामणी इमारतीसमोर एक तरुण त्यांच्यासमोर आला व त्याने अश्लील चाळे केले. तसेच, त्यांना अश्लील बोलून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस तपास करत आहेत.

About The Author

error: Content is protected !!