राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करावा – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करावा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

लातूर (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांनी 25 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस हा सर्व जिल्हा, तालुकास्तरावर व सर्व मतदान केंद्रावर साजरा करणे बाबत निर्देश दिले आहेत. या राष्ट्रीय मतदार दिवसापासून भारत निवडणूक आयोग ई-इपिक सुविधा सर्व मतदारांसाठी सुरु करत असून आता मतदारांना त्यांच्या मोबाईल अथवा संगणकाव्दारे ई-इपिक PDF स्वरुपात डाऊनलोड करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने राष्टीय मतदार दिवसासाठी “सर्व मतदारांना सशक्त, सतर्क सुरक्षित आणि जागरुक बनविण्यासाठी कटिबध्द हे घोषवाक्य” जाहीर केले आहे.

या अनुषंगाने लातूर जिल्हयामध्ये 25 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 18 वर्ष वय पूर्ण केलेल्या नवीन तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदानप्रक्रियेत सहभाग वाढविणे हा प्रमुख उद्देश असून सर्व शाळा व शैक्षणिक संस्थामध्ये वादविवाद स्वर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्वृत्व स्वर्धा, इत्यादी स्पर्धा आयोजित करुन लोकशाही मध्ये मतदारांचा सहभाग यांचे महत्व पटवून देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर मार्फत 25 जानेवारी 2021 रोजी DPDC सभागृह, प्रशासकीय इमारत, लातूर येथे राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी केंद्र व राज्याकडून निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन सर्व तरुण नव मतदार व भावी मतदार यांनी ई-इपिक सुविधेचा लाभ घ्यावा व राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात व सुरक्षितपणे साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वाराज बी.पी. यांनी केले आहे.

About The Author