जळकोट नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

जळकोट नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

प्रदेश काँग्रेस निरीक्षक जितेन्द्र देहांडे यांची माहिती

जळकोट (प्रतिनिधी) : जळकोट शहरात कॉंग्रेसची कार्यकर्ते पदाधिकारी यांची संघटन बांधणी असून गेली ४० वर्ष या भागातील विकासाला चालना काँग्रेसचे नेते लोकनेते विलासराव देशमुख, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाने दिली असून बाजार समिती, सोसायटी काँग्रेसच्या ताब्यात असून या भागातील विकासाला गती देण्यासाठी जळकोट नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्व तयारीनिशी उतरणार असून स्वबळावर लढणार असल्याचे मत प्रदेश काँग्रेस कॉंग्रेसचे निरीक्षक जितेंद्र देहाडे यांनी बोलताना सांगितले ते लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे नगर पंचायतीच्या निवडणूक २०२१ च्या निमित्ताने जळकोट शहरातील कॉंग्रेसचे नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद मेळावा शनिवारी घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक पृथ्वीराज शिरसाठ, काँग्रेस समन्वयक तथा जिल्हा बँकेचे संचालक अँड प्रमोद जाधव, काँग्रेस मिडियाचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, जळकोट तालुका अध्यक्ष मन्मथ किडे, ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, किसान सेल चे जिल्हाध्यक्ष किरण पवार, मारूती पांडे उपस्थित होते. पुढें बोलताना देहाडे म्हणाले की, जळकोट नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्व समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेवून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहे त्यासाठी आतापासून कामाला लागले पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या.

जळकोट नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकनार – निरीक्षक पृथ्वीराज शिरसाठ

जळकोट नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

जळकोट शहरात कॉंग्रेसची बांधणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे मागच्या वर्षी लोकांनी भाजपाच्या ताब्यात नगरपंचायत दिली कुठलीच कामे केली नाहीत लोकांचा भ्रमनिरास झाला असून पूर्वीपासून काँग्रेस पक्ष या भागातील विकासाला प्राधान्य दिले आहे लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी जळकोट शहरातील काँग्रेसच्या सर्व समाजातील तरुण, युवक ज्येष्ठ नागरिक, कॉँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्रिपणे यावे व आतापासून कामाला लागा असे आवाहन पृथ्वीराज शिरसाठ यांनी केले आहे.

याप्रसंगी विजय निटूरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष मन्मथ किडे, किरण पवार, नगरसेवक डॉ काळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नगरसेवक महेश धुळशेट्टे, संग्राम सूर्यवंशी, सतीश वाघमारे, धोंडीराम पाटील, महिला, काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचलन मारोती पांडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ काळे यांनी मानले

About The Author