रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

लातूर (प्रतिनिधी) : शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या जिजाऊ हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या शिवछत्रपतींच्या प्रेरणास्त्रोत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने लातूर तालुक्यातील शिराळा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यावेळी जय जिजाऊ जय शिवराय यांच्या घोषणा देण्यात आल्या अशा प्रकारे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे राज्यसंघटक श्री ज्ञानेश्वर दादा काळे, लातूर जिल्हा समन्वयक राहुल मोहिते-पाटील , लातूर जिल्हा प्रवक्ते कल्याण दादा देशमुख सदस्य ज्ञानेश्वर काळे (माऊली) खंडू पवार , श्रीकांत काळे , लक्ष्मण आतकरे, लक्ष्मण इंगळे, हिम्मत गव्हाणे, राहुल गव्हाणे तसेच प्रफुल्ल काळे ,प्रसाद काळे, विष्णु देशमुख ,ज्ञानेश्वर गव्हाणे , महादेव काळे , सुभाष माळी ,हणमंत पारवे, सोमनाथ बर्डे ,विक्रम बर्डे , अनुरथ काळे व समस्त शिराळा ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!