एमआयडीसी मधील दोन कंपन्यांमध्ये चोरी

एमआयडीसी मधील दोन कंपन्यांमध्ये चोरी

पिंपरी (रफिक शेख) : अज्ञात चोरट्यांनी दोन कंपन्यांमधून सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. भोसरी एमआयडीसी मधील इंडिया फोर्स अँड ड्रॉप स्टेम्पिंग्ज लिमिटेड आणि सुयश इंजिनिअरिंग या दोन कंपन्यांमध्ये चोरीची ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी (दि. १२) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. इंडिया फोर्स अँड ड्रॉप स्टेम्पिंग्ज: लिमिटेड कंपनीतील चोरी प्रकरणी प्रल्हाद सुलाभराव सांडभोर (वय ५३, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली. सांडभोर हे इंडिया फोर्स अँड ड्रॉप स्टेम्पिंग्ज लिमिटेड कंपनीत नोकरी करतात. फिर्यादीच्या कंपनीच्या आवारात मागच्या बाजूला मोकळ्या जागेत ७८ हजारांचे रॉ मटेरियल ठेवले आहे. अज्ञात चोरट्यांनी १९ सप्टेंबरला पहाटे तीन ते चारच्या कालावधीत कंपनीच्या आवारातून रॉ मटेरियल चोरून नेले.

सुयश इंजिनिअरिंग या कंपनीतील चोरी प्रकरणी अमेय अविनाश शेवाळे (वय २७, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या कंपनीच्या उघड्या शटरव्दारे कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून एक लाख २८ हजार रुपये किमतीचे तांब्याचे लहान ६०० पिस चोरून नेले. तसेच विकास टिलकधारी विश्वकर्मा (वय ३०) यांच्या ओम इंजिनिअरिंग नावाच्या शॉपमधून ६८ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी झाले. चोरीचा हा प्रकार मंगळवारी (दि. ११) सायंकाळी सहा ते बुधवारी (दि. १२) घडला आहे.

About The Author

error: Content is protected !!