खासगी चालकाकडून हडपसरजवळ एसटीचा अपघात

खासगी चालकाकडून हडपसरजवळ एसटीचा अपघात

पुणे (योगिता कोरे) : इंदापूर-पुणे एस.टी. गाडीला गुरुवारी सकाळी दहा वाजता हडपसरजवळ अपघात झाला. गाडीचे चालक हे नुकतेच एस.टी.त कंत्राटी पद्धतीने घेतलेले खासगी चालक होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून एस.टी.चे मात्र नुकसान झाले आहे. एस.टी. चालविण्याचे केवळ एक दिवसाचे प्रशिक्षण देऊन खासगी चालकाच्या हाती एस.टी.चे स्टेअरिंग देणे महागात पडले आहे. गुरुवारी सकाळी इंदापूरहून पुण्याला गाडी येत असताना हडपसरजवळ समोरच्या टँकरला एस.टी.ने धडक दिली. त्यात टँकर व एस.टी.चे नुकसान झाले आहे. अपघाताविषयी नेमकी माहिती नाही. मात्र, अपघात हा किरकोळ स्वरुपाचा असणार आहे. मोठा असता तर तशा सूचना व माहिती मिळाली असती.

About The Author

error: Content is protected !!