भूगोल दिनानिमित्य डॉ.व्ही. सी. दंडे यांचे व्याख्यान
अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथे भूगोल दिनानिमित्त भूगोलशास्त्र अभ्यासाचे महत्त्व’ या विषयावर सोलापूर विद्यापीठातील डॉ. व्ही. सी. दंडे यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण भारतभर मकर संक्रांतीच्या दिवसी ‘भूगोल दिन’ साजरा केल्या जातो. त्यानिमित्त येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्यावतीने भूगोल दिनाचे दि १४जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.बी सदर कार्यक्रम हा किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचालित महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मकर संक्रांतीचे औचित्य साधून आभासी अर्थात ऑनलाइन पद्धतीने भूगोल दिन साजरा होत असून, याप्रसंगी भूगोलाचे ज्येष्ठ अभ्यासक दयानंद महाविद्यालय सोलापूर येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. व्ही. सी. दंडे यांचे ‘ भूगोलशास्त्र अभ्यासाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भूगोल विभागाच्या वतीने डॉ. सचिन गर्जे, डॉ. डी. एन. माने यांनी केले आहे.
