महिलांनी सकारात्मक आनंदी जीवन जगावे
मानसोपचार तज्ञ डॉ. नितीन आळंदकर यांचे प्रतिपादन.
अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोनाच्या काळात घरामध्ये बसून बहुतांश महिलांमध्ये मानसिक ताण-तणाव, चिंता, समस्या वाढलेल्या असून त्या मानसिक मनोरुग्णा कडे झुकत आहेत. त्यामुळे महिलांनी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिल्यास जीवन आनंदी जगता येते असे जाहीर आवाहन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. नितीन आळंदकर यांनी केले. ते दिनांक 12 रोजी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत महिला समुपदेशन व मानसिक आरोग्य शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. वर्षा भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून शिवानी चवंडा,मीना तोवर,पूजा गुणाले, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ते राजेश घुले, सामाजिक परिचारक कैलास स्वामी, ओम शांती केंद्राचे जितेंद्र कोहळे सह मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये इनरव्हील क्लब, दक्षयानी महिला मंडळ, रुद्र महिला मंडळ, लिनेस क्लब, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला कोविड चे नियम पाळून उपस्थित होत्या. शिबिराचे प्रास्ताविक महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार विजेत्या आशा रोडगे यांनी सूत्रसंचालन नलिनी बेंबळे यांनी केले तथ आभार लीनेश क्लबच्या अध्यक्षा मीना तोर यांनी मानले.शिबिर यशस्वी करण्यासाठी इनरव्हील क्लब च्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
