गणेशदादा हाके पाटील व दिलीपराव देशमुख यांचा एल.आय.सी. कॉलणीच्या वतीने सत्कार संपन्न

गणेशदादा हाके पाटील व दिलीपराव देशमुख यांचा एल.आय.सी. कॉलणीच्या वतीने सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गणेशदादा हाके पाटील व दिलीपराव देशमुख मालक यांचा सत्कार एलआयसी कॉलणी मध्ये प्रा.डॉ.पांडुरंग चिलगर व चाकुर पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य सुनिल डावरे यांच्या वतीने करण्यात आला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गणेशदादा हाके पाटील यांची आठव्यांदा भारतीय जनता पार्टी च्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल व दिलीपराव देशमुख साहेब यांची भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार प्रा.डॉ.पांडुरंग चिलगर यांच्या घरी करण्यात आला . यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष मा. श्री. हणमंतराव देवकते व चाकूर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सद्स्य मा. श्री. सुनिल डावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल धुळगुंडे यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे संयोजक प्रा.डॉ.पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी संतोष जुबरे, राम चव्हाण, अमोल फुलारी,माधव पोपतवार, जगदीश गायकवाड, माधव वारलवाड, विनोद पोपतवार , प्रा डॉ. वसंत मोटेगावकर , अक्षय डावरे , प्रत्युष चिलगर, सचिन देशपांडे , अनिल धुळगुंडे, बाबुराव नाईक गुरुजी, रामदास हाके पाटील, पत्रकार प्रा. दिलीप भालेराव, पत्रकार नरसिंग सांगवीकर, शिवाजी नरवटे, ऋषी जुबरे, किरण येचवाड, कृष्णा राठोड,अंकुश सुरनर यांच्यासह माझ्या कॉलणीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!